TSA LOGO

Chikoo Festival 2025, Bordi Beach,Dahanu


165
166
167
168
169
170
171
172
173
174
175
176
177
178
179
180
181
182
183
184
185
186
Table (₹500)
Chair (₹500)
Electricity Point 6AMPs (₹500)
Electricity Point 16AMPs (₹500)
Light (₹500)
T&C.
Total Base Price: Rs.0
Extras: Rs.0
GST 18 %: Rs.0
Amount To Pay: Rs.0

नियम व अटी

  1. चिकू फेस्टिवलची वेळ: सकाळी १०.०० ते रात्री ९.००. फक्त फूड स्टॉलसाठी रात्री १०.०० वाजेपर्यंत.
  2. नोंदणी शुल्क हे स्टॉल आकार, विभाग आणि प्रदर्शित करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या प्रकारांवर आधारीत असेल. सदर शुल्क आरक्षण वेळी निश्चित केली जाईल.
  3. स्टॉल आकारणीची रक्कम रोख, धनादेश, बँक ट्रान्स्फरद्वारे विहीत नोंदणी फॉर्म पुर्ण भरुन दिल्यावरच स्वीकारली जाईल. चेक बाउंस किवा ऑनलाइन ट्रान्स्फर खात्यामध्ये दिसले नाही तर बुकिंग होणार नाही.
  4. स्टॉलधारकांनी स्टॉल बुकिंग फॉर्ममध्ये उल्लेख न केलेली उत्पादने प्रदर्शित/विक्री करण्यास सक्त मनाई आहे.
  5. चिकू फेस्टिवल मध्ये स्टॉलधारकाचे कोणत्याही प्रकारे नुकसान व चोरी झाल्यास त्याची कोणतीही जवाबदारी आयोजकांची असणार नाही.
  6. बुकींग कोणत्याही कारणान्वये रद्द केल्यास / झाल्यास भरलेली रक्कम परत करण्यात येणार नाही.
  7. चिकू फेस्टिवल प्रांगणात व दरम्यान कोणत्याही स्टॉलधारकांची चुकीची वा अयोग्य वर्तणूक आढळल्यास किंवा त्याबद्दल कोणाची तक्रार आल्यास त्याला तात्काळ त्याच्या उत्पादनांसह फेस्टिवल प्रांगणाबाहेर काढण्याचा व दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
  8. अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास ठिकाण व तारीख बदलण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
  9. स्टॉलधारकांनी स्टॉल बुकिंगच्या वेळी जी.एस्.टी. बिल घेणे. जी.एस्.टी. बिल संबंधित काही तक्रार असल्यास बिल दिल्या तारखेपासून २ दिवसाच्या आत खजिनदाराशी संपर्क साधून तक्रारीचे निवारण करून घेणे. स्टॉलवर माल विक्री करताना जी.एस्.टी. चे सर्व नियम व अटी पळूनच स्टॉलवर मालाची विक्री करावी व मालाची विक्री केल्यावर जीएसटी बिल अदा करण्याची सर्वस्वी जबाबदारी स्टॉल धारकांची राहील. जीएसटी विभागाकडून कुठल्याही प्रकारे तक्रार आल्यास त्याला सर्वस्वी स्टॉलधारक जबाबदार राहील.
  10. आपला स्टॉलची व सभोवतालची स्वच्छता (त्यासाठी कचराकुंडी), सुरक्षा तसेच् अग्निशमन व्यवस्थापनाची जवाबदारी स्टॉलधारकाची राहील. स्टॉलधारक खाद्यपदार्थ विक्रेता असल्यास कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच अग्निशमन यंत्रचे अनामत म्हणून वेगळे रु. २०००/- भरावे लागेल. स्टॉल धारकाकडून कचऱ्याचे / स्वच्छतेचे योग्य ते व्यवस्थापन न झाल्यास, तसेच अग्निशमन यंत्र सुस्थितीत परत न केल्यास ही अनामत रक्कम जप्त करून ती त्यासाठी वापरण्याचा अधिकार आयोजकांना असेल.
  11. इतर स्टॉल धारकांना अग्निशमन व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र जवळ बाळगायचे असल्यास अनामत म्हणून वेगळे ` १०००/- भरावे लागेल. ही अनामत रक्कम अग्निशमन यंत्र सुस्तीतीत परत केल्यावर पुन्हा मिळेल.
  12. खाद्य पदार्थांच्या विक्री करीता त्यांचा दर्जा हा उत्तम ठेवणे तसेच अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अनिवार्य असून त्याची प्रत सोबत बाळगणे अनिवार्य आहे.
  13. सहभागी स्टॉल धारकांना प्रतिबंधित प्लास्टिक, थर्माकोल (झबला, थैली, पिशव्या, बाटल्या, डीशेस्, पेले, चमचे इ.) वापरण्यास सक्त मनाई आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईस स्टॉल धारक जवाबदार राहील.
  14. ज्या फूड स्टॉल धारकास एक्सट्रा इलेक्ट्रीकल कनेक्शनची आवशक्यता असेल त्यांना अतिरिक्त शुल्क आकारले जाईल व त्याची नोंदणी स्टॉलधारकांच्या सभेमध्ये करावी लागेल.
  15. चिकू फेस्टिवल प्रांगणात अवजड वस्तू व वाहनांना दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ९.०० वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल. दि. १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी कोणत्याही कारणास्तव वाहनांना आत प्रवेश नाही.
  16. दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ठीक ४.२५ वा. सर्व स्टॉलधारकांची सभा एस.आर.सावे कॅम्पिंग ग्राउंड बोर्डी येथे भरेल.
  17. स्टॉल धारकांना कोणत्याही प्रकारचा आक्षेप विरोध असल्यास त्यांनी तो संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून सोडविणे. स्टॉल धारकांनी चिकू फेस्टिवल प्रांगणात उपद्रव घातल्यास त्यांना चिकू फेस्टिवल मधून स्टॉल लावण्यासाठी कायमचे बाद केले जाईल.
  18. चिकू फेस्टिवलच्या कालावधीत स्टॉल धारकांनी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा त्याचा फेस्टिवल मधील लोकांना त्रास झाल्यास त्यांना त्वरित प्रांगणातून बाहेर काढण्याचा अधिकार आयोजकांचा राहील.
  19. आपणा सर्वांना माहितच आहे, तीन वर्षापूर्वी कॅम्पिंग ग्राउंड येथे जुनी सुरुची झाडे छाटून नवीन सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे स्टॉलच्या आत किंवा बाहेर झाड किंवा त्याचा बुंधा आल्यास आयोजकांना सहकार्य करावे तसेच झाडाचा उपयोग सजावट करून त्या झाडाचा वापर त्या झाडास कोणतीही इजा न पोहचविता आपल्या फायद्यासाठी करून आम्हास सहकार्य करावे ही विनंती.

Stall Category (स्टॉलचा प्रकार)

  • Non Veg (नॉन वेज) – Rs. 15,000/- (Including GST)
  • Veg (वेज) – Rs. 12,000/- (Including GST)
  • Non Veg Non Cooking (नॉन वेज नॉन कूकिंग) – Rs. 10,000/- (Including GST)
  • Veg Non Cooking (वेज नॉन कूकिंग) – Rs. 10,000/- (Including GST)
  • General Stall (सामान्य स्टॉल) – Rs. 8,500/- (Including GST)

CF 2025 Online Stall Booking Instructions

  1. Chikoo Festival 2025 once the stall is booked will not be cancelled for any reason.
    चिकू फेस्टिवल मधील स्टॉल कोणत्याही कारणास्तव रद्द केले जाऊ शकत नाहीत.
  2. You can only book a maximum of 2 (two) stalls from 1 (one) mobile number.
    तुम्ही 1 (एक) मोबाईल नंबरवरून जास्तीत जास्त 2 (दोन) स्टॉल बुक करू शकता.
  3. Chikoo festival 2025 organization team will have full authority to cancel your stall or take appropriate action before/after the booking.
    चिकू फेस्टिव्हल 2025 संस्थेच्या टीमला तुमचा स्टॉल रद्द करण्याचा किंवा बुकिंग करण्यापूर्वी/नंतर योग्य कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार असतील.
  4. How to book an online stall:
    • Place your 10-digit WhatsApp mobile number and press a button to get an OTP.
    • Once you receive the OTP on your registered mobile, enter it in the OTP box for further verification.
    तुमचा 10 अंकी whatsapp मोबाईल नंबर नमूद करा आणि OTP मिळवण्यासाठीचे बटण दाबा...
  5. Once OTP verification is done, fill all the information correctly to generate an online invoice.
    OTP पडताळणी झाल्यानंतर ऑनलाइन बील तयार करण्यासाठी सर्व माहिती योग्यरित्या भरा.
  6. Stall Business Category should be mentioned as per your product sold during the festival.
    उत्सवादरम्यान तुमच्या उत्पादनाच्या प्रकारानुसार...
  7. During the stall booking, you can select/book a maximum of 2 stalls from one mobile number.
    स्टॉल बुकिंग दरम्यान तुम्ही एका मोबाईल नंबरवरून...
  8. All the stall prices/GST/Extra services prices will be calculated on a real-time basis.
    सर्व स्टॉलच्या किमती/GST...
  9. Once you click on Submit & Pay, it will redirect to the payment gateway for further online payment procedure.
    तुम्ही सबमिट अँड पे वर...